२७ वर्षांनंतर मुलाचा आवाज ऐकून अखेर काेमातून आई आली बाहेर

कधी-कधी काही असे चमत्कार होतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणं खूप अवघड असतं. संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) मुनिरा अब्दुल्ला ही महिला २७ वर्षांनंतर काेमातून बाहेर आली. या महिलेची जखमी झाल्यापासून ते शुद्धीवर येण्यापर्यंतची संपूर्ण कथा एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी मुनिरा एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाली हाेती. तिच्या कारला शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या बसने धडक दिली हाेती.

ती कारमधील तिच्या चारवर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात मेंदूला जखम झाल्याने काेमात गेली हाेती. ही घटना १९९१ मध्ये घडली हाेती. त्यानंतर उपचारासाठी तिला लंडनला हलव‌ण्यात आले. दीर्घकाळापर्यंत उपचार सुरू हाेते; परंतु काहीही फायदा हाेत नव्हता.

डॉक्टर म्हणतात, “या रुग्णाची स्थिती खूपच दुर्मिळ आहे, परंतु अशी स्थिती येणे पण अशक्य नाही. ज्या पद्धतीने अब्दुल्ला यांची चेतना परत आली आहे तो बर्याच रूग्णांसाठी एक आशेचा किरण आहे. परंतु, यापूर्वी हि अशीच एक व्यक्ती 20 वर्षांनंतर कोमामधून बाहेर येऊन बोलायला लागली होती.”

27 वर्ष हॉस्पिटलमध्ये असताना अब्दुल्ला यांना ट्यूबद्वारे अन्न व पाणी देण्यात आले व फिजियोथेरेपी देखील केली जात असे. डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या उपचार टीमने उपचारांच्या प्रत्येक परिस्थितीची काळजी घेतली आणि त्यांच्या कमकुवत स्नायूंची विशेष काळजी घेतली. त्याला फिजियोथेरपीसाठी व्हीलचेअरमध्ये बसून नेले जात असे जेणेकरून त्यांना काही नैसर्गिक गोष्टी जाणवल्या जातील जसे पक्ष्यांची गाणी ऐकणे इ.

शेख माेहंमद बिन झायेद यांनी केली आर्थिक मदत

मुनिराच्या अवस्थेबाबत देशाचे राजे शाह शेख माेहंमद बिन झायेद यांना २०१७ मध्ये माहिती मिळाल्याने त्यांनी तिला आर्थिक मदत देऊन जर्मनीत उपचारासाठी पाठवले. तेथे तिच्यावर मांसपेशींची शस्त्रक्रिया केली गेली. त्यानंतर तिच्या प्रकृतीत काहीही सुधारणा दिसून आली.

यादरम्यान रुग्णालयाच्या एका खाेलीत तिचा मुलगा उमर हा कुणाशी तरी बाेलत हाेता. त्याचे बाेलणे ऐकून मुनिरा अचानक शुद्धीवर येऊन काेमातून बाहेर आली. तसेच तिने त्याला नावाने बाेलावण्याचा प्रयत्नही केला.

आता तिची प्रकृती पहिल्यापेक्षा खूप चांगली असून, ती कुटुंबातील इतर सदस्यांनाही ऐळखू लागली आहे. तसेच त्यांच्याशी संवादही साधण्याचा प्रयत्न करतेय; परंतु तिला पूर्णपणे बरे हाेण्यास आणखी काही कालावधी लागेल, असे डाॅक्टरांनी सांगितले.

वरील दिलेली माहिती पूर्णपणे बरोबरच असेल असं नाही. ते लेखकाने वयक्तिक अभ्यास करून मांडलेली माहिती आहे. याचा Bhannatre.com शी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply