डाव्या कुशीवर झोपण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या

चांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, आपल्याला झोपण्याची दशा आणि दिशा ठरवते आपले आरोग्य. तसे तर लोकं स्वत:ला आरामदायक वाटणार्‍या स्थितीत झोपणे पसंत करतात पण डाव्या कुशीवर झोपण्याचे काही विशेष फायदे आहेत. झोपताना डाव्या कुशीवर झोपवे आज जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपल्याने होणारे फायदे जाणून घ्या:

याने शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात. गर्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे कारण याने गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत नाही. याव्यतिरिक्त टाचा, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होते.

डाव्या बाजूला झोपण्याने रक्त प्रवाह सुरळीत होत असल्याने झोप पूर्ण होते. या स्थितीत झोपून उठल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात.

या प्रकारे झोपल्याने पचन क्रिया सुरळीत होते आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही. डाव्या बाजूकडे झोपल्याने शरीरात जमा होत असलेले टॉक्सिन लसिका वाहिनी तंत्राद्वारे बाहेर पडतात.

बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. आराम मिळेल. गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होतं.

पोटासंबंधीचे विकार असल्यास डाव्या कुशीवर नियमित झोपावे.

गर्भवती असताना महिलांच्या पायाला सूज येते. यावेळी अशा महिलांनी डाव्या कुशीवर झोपावे. 

रक्तप्रवाह सुरळीत होतो.

हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीही डाव्या कुशीवर झोपणे गरजेचे आहे. असे केल्याने हृदयावर दबाव जाणवत नाही.

टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘भन्नाटरे.कॉम’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply