आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा पाकिस्तानला दणका!

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 39 जवान शहीद झाले आहे. शहीद जवानांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा परिसरात सीआरपीएफच्या एका ताफ्याला लक्ष्य केलं. या हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरच्या अनेक परिसरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक, आर्थिक आणि व्यापारी अशा सर्वच पातळ्यांवर पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने पाकिस्तानचा अतिविशेष राज्याचा ( मोस्ट फेवर्ड नेशन) दर्जा काढून घेतला होता. यानंतरही भारताकडून राजनैतिक स्तरावर पाकिस्तानला अजून काही धक्के दिले जाण्याची शक्यता आहे.

भारताच्या या आक्रमक धोरणाचे प्रत्यंतर सोमवारी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात आले. पाकिस्तानने अटक केलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात सोमवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाहीर  सुनावणी होत असून, एकूण चार दिवस ही सुनावणी चालणार आहे.

भारतातील प्रसिद्ध वकील हरीश साळवे हे भारत सरकारच्या वतीने जाधव यांची बाजू मांडत आहेत. त्यांच्या दिमतीला भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारीही हेगच्या न्यायालयात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या विधिज्ञांची फौजही येथे आहे. या खटल्यापूर्वी न्यायालयात घडलेल्या एका प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

न्यायालयात आल्यानंतर पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल अन्वर मन्सूर भारतीय परराष्ट्र खात्यामधील अधिकाऱ्यांना भेटायला गेले. यावेळी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव दिपक मित्तल यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. मात्र, मित्तल यांनी हस्तांदोलन करायला नकार देत अन्वर मन्सूर यांना दुरूनच नमस्कार केला. हा प्रसंग अनेक कॅमेऱ्यांनी टिपला.

यानंतर सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा सुरु आहे. दिपक मित्तल यांची ही कृती म्हणजे भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेल्या आक्रमक धोरणाचे द्योतक असल्याची चर्चा आहे. या साऱ्या प्रकारामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे.

पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर युरोपियन युनियननं पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. युरोपियन युनियननं ब्लॅक लिस्टेड केल्यानं पाकिस्तानसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. पाकिस्तानसोबत सौदी अरब, पनामा आणि अमेरिकेतील 4 राज्यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

पुलवामा हल्ल्यात दहशतवाद्यांनी 200 किलो स्फोटकं वापरली त्याच 200 किलोचा बदला भारतानं घेण्यास सुरुवात केला आहे. पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या सगळ्या वस्तूंवर भारतानं थेट 200 टक्के आयातशुल्क लादलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला भारतात व्यापार करणं कठिण होणार आहे, या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

ही वाढ त्वरित लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कांदा, साखर, मसाल्याचे पदार्थ यांवरची कस्टम ड्युटी वाढण्याची चिन्हं आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी ट्विट करून दिली आहे.

Leave a Reply