‘या’ देशात सुरू आहे २०११ साल!

या' देशात सुरू आहे २०११ साल!

या’ देशात सुरू आहे २०११ साल!

जगभरातील वेळा स्थानपरत्वे वेगवेगळ्या असतात आणि नवे वर्षही त्याप्रमाणे निरनिराळ्या वेळी सुरू होत असते, हे आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे 31 डिसेंबरला सायंकाळाचे साडेचार वाजलेले असतात त्यावेळी न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात रात्रीचे बारा वाजतात आणि नव्या वर्षाचा जल्लोष सुरू होतो! जगभरात 2019 सालाचे निरनिराळ्या वेळी का असेना, जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र, एक देश असा आहे जिथे अजून 2011 हेच वर्ष सुरू आहे याची तुम्हाला माहिती आहे का? हा देश जगापेक्षा आठ वर्षे मागे आहे!

हा देश आहे इथियोपिया. तो जगाच्या मागे असण्याचे कारण म्हणजे या देशात बारा महिने नव्हे तर तेरा महिन्यांचे एक वर्ष असते!

जगभरात इतर सर्व देशांमध्ये बारा महिन्यांचे एक वर्ष असते. आफ्रिकेतील दुसर्‍या क्रमांकावरील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या इथियोपियाने मात्र हा तेराव्या महिन्याचा रिवाज अद्याप सुरूच ठेवलेला आहे. एरव्ही आपण संकटे अधिक आली की ‘दुष्काळात तेरावा महिना’ असे म्हणत असतो; पण इथियोपियात मात्र खरोखरच तेरावा महिना असतो. सुमारे दहा कोटी लोकसंख्या असलेला हा देश अनेक बाबतीत जगापेक्षा वेगळा आहे. याठिकाणी नवे वर्ष 1 जानेवारीला नव्हे तर 11 सप्टेंबरला साजरे केले जाते. अर्थात प्रत्येक ठिकाणच्या, संस्कृतीच्या कालगणनेप्रमाणे नवे वर्ष वेगवेगळ्या महिन्यात सुरू होऊ शकते. मात्र, इथियोपियात व्यवहारातही 11 सप्टेंबरलाच नवे वर्ष सुरू करण्याची वहिवाट आहे. या सर्व गोष्टींमुळे तिथे आता 2019 नव्हे तर 2011 हेच वर्ष सुरू असून ते जगापेक्षा आठ वर्षांनी मागे आहे!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

Leave a Reply